पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभामंडप. प्रक० ३७ बाजूस अंगण १०० हात लांब व ५० हात रुंद असे उघडे होते व तें खांबांनी व सुताच्या पाडग्यांनी वेष्टून मर्यादित केले होते. ३. परमपवित्रस्थानासाठी त्याने शिट्टी लाकडाचा कोश करून सो- न्याने मढविला आणि त्यांत आज्ञांच्या दोन पाम्या आणि मानाने भरलेले पात्र ठेवले होते. कोशाचे झांकण शुद्ध सोन्याचे केलेले असतां ते दयासन असे होते, आणि त्या झांकणावर दोन दूतांच्या घडीव सोन्याच्या आकृत्या होत्या. त्यांची तोंडे दयासनाकडे केलेली होती, आणि त्यांच्या पंखांनी दयासन झाकले होते. पवित्रस्थानासाठी त्यांनी शिट्टी लाकडा- ची धूपवेदी करून सोन्याने मढविली आणि ती वेदी परमपवित्रस्थाना- कडे पवित्रस्थानाच्या मध्य भागी उभी केली. ज्या मेजावर सर्वदा बारा भाकरी असावयाच्या ते मेज शिट्टी लाकडाचे सोन्याने मढविलेले असे केले. आणि शुद्ध सोन्याचे सात फांध्यांचे दिव्याचे झाडही करून ठेवले. ज्यावर पशुहोम जाळावयाचा असी होमवेदी पवित्रस्थानांत जाण्याच्या दरवाज्या समोर काहींसे दूर अंगणांत केली. ती वेदी शिट्टी लाकडाची पितळाच्या पत्रांनी वेष्टिलेली आणि मध्ये माती भरलेली असी होती. याजकांची शुद्धि करण्याकरितां पितळाचे गंगाळ मंडप आणि होमवेदी यांच्या मध्ये अंगणांत ठेवले होते. सूचना-सभामंडप याला परमेश्वराचा मंडप (१ राज० २,२८) आणि संकेतलेखाचा डेरा (गण०९,१५ ) असे झटले आहे. तेथे लोकांची भेट घ्यावी, आपली कृपा तेथे त्यांस दाखवावी आणि तेथेच आपल्या लोकांमध्येही राहावें असी देवाची इच्छा होती. तो मंडप तर इस्राएलामध्ये देवाच्या राज्याची उपमा आणि ख्रिस्ती मंडळीचे प्रतिरूप असा होता. परमपवित्रस्थानांत यहोवा साक्षात् राहतो. पवित्रस्थानांत यहोवापासी लोकांनी राहवे, परतु त्यांनी मटले होते की, आमच्याने यहावाजवळ जावत नाही, ह्मणून त्यांस मध्यस्थाची गरज होती (प्रक० ३५ कलम १ पाहा). यास्तव त्यांनी पवित्रस्था- नांत जाऊ नये, केवळ अंगणांत जावे आणि याजकांनी मात्र पवित्र- स्थानांत जावे असी आज्ञा होती. परमपवित्रस्थानांतील जो कोश यांत संकेतलेखाच्या पाया होया आणि त्या लोकांच्या पापी अव- स्थविषयी साक्ष देणाऱ्या अशा होत्या. परंतु ज्यावर यहोवा आरूढ