पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ३७] सभामंडप. प्रक० २७. सभामंडप. (निर्ग० २५–४०). १. आणि परमेश्वराने मोश्याला सांगितले होते की: "म्या तुम्हा- मध्ये वस्ती करावी ह्मणून मजसाठी पवित्रस्थान करा.- मंडपाचा व त्यांतील सर्व पात्रांचा डौल जो मी तुला दाखवितो त्या अवध्याप्रमाणे करा. यास्तव इस्राएलाच्या संतानांस सांग की, ज्याची इच्छा असेल त्याने आपल्या संतोषाने परमेश्वराला अर्पण द्यावे, ह्मणजे सोने, रुपे, पितळ, उंच पाषाण, बारीक सूत, कातडी, सुवासिक धूप व सुगंध द्रव्ये ही द्यावी.” त्याप्रमाणे इस्राएलाच्या संतानांतील पुरुष व बायका ज्यांस इच्छा झाली, त्यांनी संतोषाने आणले. गरजेपेक्षां लोक अधिक आणीत होते, ह्मणून मोश्याने छावणीतून असा हुकूम प्रगट करविला की "पवित्र वर्गणीसाठी कोणी आणखी काही आणू नये.” तसे लोकांनी आणण्या- चे बंद केले.- आणि ज्यांस परमेश्वराने नांवाने बोलावून आपल्या आ- तम्याने या उत्तम व कौशल्याच्या कामासाठी ज्ञान दिले, ते, मणजे बस- लेल व अहलियाब यांनी या कामांत उद्योग केला. आणखी जे दुसरे सुज्ञ मनाचे पुरुष होते, ज्यांच्या अंतःकरणांत परमेश्वराने ज्ञान ठेवले आणि ज्यांस काम करण्यासाठी जवळ येण्याची प्रेरणा झाली त्यांनीही काम केले. आणि ज्या सुज्ञ बायका हे काम करायास संतोषाने इच्छित होत्या त्या सर्वांनी पवित्रस्थानासाठी बारीक व उंची वस्त्रे विणिली. २. आणि जो नमुना मोश्याने डोंगरावर पाहिला होता त्याप्रमाणेच कारागिरांनी मंडप केला. त्याची लांबी तीस हात, रुंदी दाहा हात, आणि उंची दाहा हात. त्याच्या भिंती शिट्टी लाकडाच्या फळ्यांच्या सो- न्याने मढविलेल्या होत्या. मंडपाच्यावरून दुहेरी कातड्यांचे आच्छादन होते, यांत छताची कातडी कमावून लाल रंगविलेली असीं होती. मंड- पाच्या आंत जाण्याचे द्वार पूर्व दिशेकडे होते, आणि त्यासमोर उंची कापडाचा पडदा लावलेला होता. आंतली जागा दुदालनी होती. पवित्रस्थान मटलेले पुढचे दालन वीस हात लांबीचे होते. परमपवित्र- झटलेले मागील दालन होते, आणि ही दोन दालने अति संदर व उंची कापडाच्या पडद्याने विभागली होती. मंडपाच्या चार