पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सोन्याचे वासरूं. प्रक० ३६ छावणीच्या बाहेर काहींसा दूर दिला*). आणि मोशे मंडपांत गेला, तेव्हां ढगाचा खांब उतरून मंडपाच्या दारी उभा राही, आणि परमेश्वर मोश्या- सी बोले, आणि सर्व लोकांनी ढगाचा खांब पाहून नमन केले. आणि जसे कोणी आपल्या मित्रासी बोलतो तसे परमेश्वर मोश्यासीं तोंडोतोड बो- लला. आणि मोशे परमेश्वराला ह्मणालाः “पाहा, तूं मला सांगतोस, या लो- कांस ने, परंतु मजसंगती कोणाला पाठविसील हे त्वा मला कळविलें नाहीं. जर तुझी समक्षता येत नाहीं ।) तर आमास एथून नेऊ नको. आणि .मजवर व तुझ्या लोकांवर तुझी कृपादृष्टि झाली आहे तर कशाने कळेल? तूं आमच्या संगतीं येतोस तेणेकरून की नाही?" मग परमेश्वराने मोश्या- ला मटले: “जी गोष्ट त्वा मटली तीही मी करीन." - *) लोकांनो पाप केल्यामुळे त्यांचा देवापासून वियोग झाला. जोपर्यंत देवाने कृपा करून त्यांचा पुन्हा स्वीकार केला नाही तोपर्यंत यहोवाच्या राहण्याचें पवित्रस्थान लो- कांच्या छावणींच्या मध्यभागों असणे अनुचित आहे; म्हणून मोश्याने ते छावणीच्या बाहेर नेऊन दूर उभे केले. + ) देवाची समक्षता म्हणजे देवपणांतील प्रगट होणारी जी दुसरी व्यक्ति तिची संज्ञा होय. साधारण दूतांपैकी कोणी आपल्या संगती यावे याविषयीं मोशे कबूल करीत नाही, तर ज्या दूतामध्ये देवाचें नाम आहे (निर्ग० २३, २१) त्याने संगनी यावें असे इच्छितो (प्रक० १० कलम २. यावरील टीका + पाहा). . ४. परमेश्वराने मोश्याला सांगितले की: "तूं आपणासाठी दगडी दोन पाया घडून कर, मग पहिल्या पाट्यांवर ज्या गोष्टी होत्या, त्या मी ह्या पायांवर लिहीन, आणि तूं माझ्याजवळ एथे डोंगराच्या शिखरावर उभा राहा.” मग मोशे तसे करून परमेश्वरापासी ४० दिवस व ४० रात्री तेथे होता; त्याने अन्न खाले नाही व तो पाणी प्याला नाही. मग मोशे सीना डोंगरावरून उतरतां त्या संकेतलेखाच्या दोन पाया त्याच्या हातांत होत्या. आणि परमेश्वर त्यासी बोलल्यामुळे आपल्या तोंडाचे कात- डें तेजस्वी झाले हैं मोश्याला ठाऊक नव्हते, तर अहरोन व सर्व इस्रा- एलाची संताने हे पाहून मोश्याजवळ जायास ते भ्याले. तेव्हां त्याने आपल्या तोंडावर आच्छादन घातले आणि मग परमेश्वराने जे त्याला सांगितले होते, ते अवघे त्याने त्यांस आज्ञा करून सांगितले.