पान:पद्य-गुच्छ.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काजव्याला निमंत्रण ४४ काजव्याला निमंत्रण स्वागत असो तुला ये ठेविलिं वातायनें पहा उघडी खद्योता ! संगतिचा लाभ मला दे निदान एक घडी पाहुनि तेज तुझें हें बेडावुनि पूर्ण हृदय मम गेलें लागे ध्यास तुज करी घेइन केव्हां असे मला झाले कृमिकीटक इतर पहा दीपशिखालुब्ध होउनी जाती मालवतां ती तनेत्रा वरती येऊनि अंधता पड़ती परि देवें तुजजवळी पाजळुनी नित्य ठेविला आहे. दिव्य दिवा स्नेहाविण स्वयंप्रकाशी अखंड जो राहे तेजस्वी तूं अससी किमपि अपेक्षा तुला न इतरांची अन्या ज्योतिमतांची संगत ही नावडे तुला साची देह तुझा अणुमित परि तेज जणूं वीज सर्व सांठविली • नापेक्षिति वय आकृति तेजस्वी' म्हण यथार्थ आठवली अद्भुत चमत्कृती तव सर्गी जी विश्वनायकें केली पाहुनि ती तूं भूतलवासी ही कल्पना विरुनि गेली पृथ्वी जळतत्त्वात्मक रसें तुझें अशनपान सांग मला होइल केविं ? सुधेचा भोक्ता तूं मज विचार हा गमला रात्रिवधू कंठांतिल तारामौक्तिक सतेज जरि आहे काजळि शाळेतिल तूं हिरा विभूषण सतेजपर पाहे भूतलिं जलिं वृक्षशिरी क्षणि एके अंतरालिं तरि दिससी क्षणं दुसन्या गति ऐसी चपल मनासम सलील तूं वरिसी स्पर्धा तुजसिं कराया एकच मज अखिल जगतिं वस्तु दिसे ती प्रेमपूर्ण दयिताविमलनयन-जलरुहीं निमेष असे वनकांताराभ्यंतरि पक्षिकुळे जेथ झोप घेति सुखें सर्पादिक वावरती पिउनि निशावात थंडगार मुखे ८७