पान:पद्य-गुच्छ.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८८ पद्य - गुच्छ सलिल प्रवाह जेथें झुळझुळसा शब्द एकसरि करिती रातकिडे किराकर किर करुनि द्विजवेदपाठपद वरिती तेंच तुझें आवडतें स्थळ लीलाबहर सर्व दाखविली तेथें तूं प्रेक्षकजननयनांतें धन्यतेस पावविसी तुज पाहुनियां उडतां वाटे मणिदीप उजळ बहु साचे हातीं घेउनि आनंदाने वनदेवता झुलत नाचे अथवा वाटे पृथ्वी पाहूनि दुरून मोह ज्या पडला ऐसा कोणी तारा स्वर्गांतुनि येथे येउनी रमला »3- ४५ चिमणीचें घरटें बांकां इथें म घरटें मम चिमणे द्याल काय मज इतुकें देणें गृह तुमचें नृपसदनचि दुसरें आश्रित गण त्या भूपणचि खरें. कुंद कोपरा इवला तिवला पुरेल तो मम संसाराला या बागेंतचि करोन गोळा चार काटक्या वरि पाचोळा त्यांतचि माझें निजर्णे बसणें बघुनि निवारा वर बांधियले त्या झाडावर होतें पहिले झंझावातें उमटुनि गेलें निसंतान हा ! माझें झालें फिरुनि बघितली जागा खाशी