पान:पद्य-गुच्छ.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८६ पद्य-गुच्छ ४३ गासी व्यर्थचि तूं कोकिळे ! गासोऽव्यर्थचि तं कोकिळे आवर्षण पनि भू करपली. ग्रीष्म-उग्रता वसंत आली ठिणगी पडतां पेटे होळी छायेमध्ये प्राण तळमळे वृक्षगण पहा सारा सुकला. झाला पालविचा पाचोळा स्मशान भासे नव्हे हा मळा मेला जगला जीवहि न कळे आम्रमंजिरी क्वचितचि उरली उरली तीही काळी पडली रुक्ष टरफलें तोंडी बनली आसवलव तुज केवि मिळे स्वभाव में जरि तूं गासी तरि कौतुक तव काय जगासी आत्मनिष्ठ मधुरता तयासी गर्ववाहसी फुकट खुळे जा सोडुनि हा निष्फळ चाळा डुनि काढी अपुल्या बाळा पाज लाव त्या कांहिं जिव्हाळा मातृपद तरी सहज फळे स्वाभिमान हा श्रेष्ठ गुण खरा रुचि न त्यां विना परोपकारा परपिंडानें पुष्ट नच वरा देह हैं न तुज अजुनि कळे