पान:पद्य-गुच्छ.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(8) अशी लघुकथा घेतली तरी ती शब्दसंख्येने एखाद्या खंडकाव्याइकी मोठी भरेल ! पद्य लिहून जशी थोडक्यांत करमणूक करितां येईल, तशी गद्यांत होऊं शकणार नाहीं. सुनीत किंवा गझल घेतला तर त्याचें काम किती थोड्या ओळींत 'भागून एखादी तुटक कल्पना संपूर्णत्वाने रंगविता येते ? इतक्या संक्षेपांत गद्याला आपले काम साधावयाचें तर ज्याला 'गद्यकाव्य' म्हणतान तसे लिहावें लागेल. याचाच अर्थ तें शुद्ध सरळ गद्य नव्हे. पद्याच्या अंगी इतके गुण असतांहि त्याचा इतका थोडा उपयोग केला जातो याचा अर्थच हा कीं, मनुष्याच्या जीवनांत गंभीर व्यवसायाच्या मानानें करमणुकीचें प्रमाण फार थोडें असतें. स्वतः माझीच गोष्ट घेतली तर हें दिसून येईल कीं, 'गद्यगुच्छ' हें माझें पुस्तक दोनशे पानांचें व 'पद्यगुच्छ ' हें शंभर पानांचे आहे. पण गद्यगुच्छांतील माझे लेखन हें माझ्या एकंदर गद्य लेखनाचा एक पांचशेंअंश इतकें भरेल, तर माझ्या पद्यगुच्छांत समाविष्ट न झालेल्या अशा माझ्या कविता पांच सात पानेंहि भरणार नाहींत ! अर्थात् या करमणुकीच्या साधनाचा मी इतका अल्प उपयोग करून घेतला आहे. पद्यगुच्छांतील माझी सर्वांत जुनी कविता १८९२ साली लिहि- लेली असावी, व सर्वांत अगदी अलीकडची कविता १९३५ च्या मार्चमध्यें लिहिली असेल. म्हणजे सुमारे ४३ वर्षांत मी लहान आकाराची शंभर पानें भरतील इतकी थोडी कविता लिहिली हें उघड होतें ! ही गोष्ट एका बाजूनें मी हौशी कवि नाहीं हें सिद्ध करण्याला जशी उपयोगी पडते, तशीच ती, कविता करणें हें साहित्य - व्यवसायी माणसाच्या खास करम- णुकीचें एक साधन ठरविण्यालाहि उपयोगी पडेल. माझी एखादी कविता केवळ प्रसंग साजरा करण्याकरितां नडीमुळे लिहिलेली आहे. उदा० गत- वर्षी 'सहयाद्रि' मासिक मी सुरू केलें तेव्हां त्याच्या पहिल्याच अंकांत सहयाद्रिविषयक एखादी कविता यावी अशी मला इच्छा झाली. आणि असलें काम लोकांना सांगून करवून घेण्यापेक्षां स्वतः करणेंच अधिक सोयीचें व हुकुमी असतें, म्हणून ही नड भागविण्याकरितां ' रायगडावरील हिरकणी बुरुजाचा पोवाडा' मी लिहिला. पण असे प्रसंग अर्थात् थोडे. सामान्यतः करमणुकीकरितांच मी कविता लिहिल्या. मग त्यांत कांहीं प्रसंगविशेषानें सहज सुचल्या. कांहींत तर पहिली ओळ सहज मनांत स्फुरून तोंडाने निघाली