पान:पद्य-गुच्छ.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५) व तिच्या अनुरोधाने बाकीच्या लिहिल्या गेल्या असेंहि घडलें आहे. आतां मनुष्य लिहावयालाच बसला म्हणजे त्याच्या मनःप्रवृत्तीप्रमाणें तो केव्हां रस आळवील, केव्हां अलंकारावर भर देऊन कल्पनावैचित्र्यांत रमेल, तर केव्हां सत्प्रवृत्त असा बोधहि त्याला कवितेंत घालावासा वाटेल. आणि या सर्वांतून कलानिर्मिति होणें हें त्याच्या जातिवंत कवित्व गुणावर अवलंबून राहील. पण ती निर्मिति न झाली तरी, आपण एका उच्च प्रतीच्या करमणु- कीच्या आनंदाचा लाभ घेतला, या विचारानें तरी तो कृतकृत्यता मानील यांत शंका नाहीं. मात्र त्याचें त्या वेळचें कृत्य व कर्तव्य तितकेंच मर्यादित असतें ! . • हैं सर्व सांगण्याचें कारण इतकेंच कीं, मी कवि नसतांहि कविता करण्याच्या नादांत, अगदी क्वचितच कां होईना, कां पडलों याचें प्रांजल समर्थन करावें. १९३१ च्या डिसेंबरांत उज्जयिनी येथे कविसंमेलनाचा अध्यक्ष होण्याचा बिकट प्रसंग मजवर येऊन पडला. त्या वेळच्या माझ्या भाषणांत मी असें म्हटलें होतें:- "माझी विनयबुद्धि मला असें सांगते कीं, मी स्वत:ला कवि म्हणवितों असा लोकांचा गैरसमज न होऊ देण्याची खबरदारी मला घेतली पाहिजे. अवंती येथील कवि सम्मेलनाचा अध्यक्ष म्हणजे काव्य- सिंहासनावर, क्षणभर का होईना पण मान्यतापूर्वक बसविला जाणारा राजा ! म्हणून त्या पदाला स्पर्श करितांना, विक्रमाच्या खांद्यावर बस- णारा वेताळ किंवा भोजाच्या सिंहासनाला जोडलेल्या पुतळया यांनी जसा त्या राजांना त्यांच्या पात्रतेविषयी प्रश्न विचारून कुंठित केलें तसेंच मला कोणी दुसऱ्यानें न म्हणतां मी होऊनच उत्तर देत आहें कीं, कोण- ताच कविगुण मजमध्यें नाहीं. कविसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा जुलूमच मजवर झाला आहे. आज प्रस्तुतचें पुस्तक प्रसिद्ध करतांनाहि तीच भूमिका माझी कायम आहे, व त्या अर्थाचें आश्वासन आगाऊच देत आहें. इतकीच कीं, या कविता मी जशा केवळ करमणुकीकरितां लिहिल्या तशाच त्यांनी त्या मजशी सहानुभवी होऊन, करमणुकीकरितांच वाचाव्या. मी वाचकांना वाचकांना विनंति हे पुस्तक हल्लीं छापून हातावेगळें करण्याचें कारण इतकेंच कीं, अनेक कामांत मी आपल्या हातानें मांडलेला पसारा आपल्याच हातानें आवरावा