पान:पद्य-गुच्छ.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३) (५) गद्यांत अनुप्रास मर्यादेबाहेर साधितां येत नाहींत ; पद्यांत अनु- प्रासाची मर्यादा लवचिक असते. (६) गद्यांत अंत्य यमक ठराविक कालांतराने सावण्याचें कारण नसतें, व फारसें साधतांहि येत नाहीं. पण पद्यांत तें ठराविक कालांतरानें साधावें लागतें. पण हें बंधनच दोन तन्हांनी उपयोगी पडते. एक तन्हा अशी कीं, ठराविक वेळानें तेंच तेंच अक्षर, तोच तोच ध्वनि, कानावर आल्यानें तालबद्धतेचा व स्वर- पुनरुच्चाराचा आनंद लाभतो. आणि दुसरा प्रकार म्हणजे यमक जुळविण्याच्या नडीनेंच एरवीं कदाचित् सुचल्या नसत्या अशाही कल्पना सुचविल्या जातात. कल्पना- वैचित्र्याच्या दृष्टीनें पाहतां सयमक कविता ही निर्यमक कवितेपेक्षां सहजच अधिक चांगली ठरते. मराठीतील कांहीं निर्यमक व सयमक कविता कोणी ताडून पाहि- ल्यास हें म्हणणें त्याला पटेल. तात्पर्य, यमक हैं एका बाजूनें बंधनकारक म्हणून कष्टदायक वाटत असले तरी दुसऱ्या एका बाजूनें पद्यकाराला तें उपकारकच ठरतें. (७) पद्य हें तालासुरावर गातां येतें हा त्याचा गुण गद्यापेक्षां फारच फार श्रेष्ठ ठरतो. गद्य वाचतांना कदाचित् एकाद दुसऱ्या प्रकारचा हेल काढून गाण्याच्या सुराचा आभास उत्पन्न करितां येईल परंतु ताला- शिवाय गाण्याचा खरा पुरा आनंद नाहीं. आणि गद्यच जर तालबद्ध व गेय झालें तर त्याला गद्य कोण म्हणेल ? तें पद्यच होय. ठरीव क्रमानें ठरीव कालांतरानें मात्रांचें आवर्तन पुरें करून पुनरुक्ति करणें यांत जो आनंद आहे तो निव्वळ भरमसाट गद्यांत कधींहि लाभणें शक्य नाहीं. (८) पण सर्वांत शेवटचा गुण उपयुक्ततेचा. तो असा कीं, पद्याच्या ओळी किंवा तुकडे जसे स्मरणांत राहतात, तसे गद्याचे राहू शकत नाहींत. ते स्मरणांत राहण्याला संक्षेप, शब्दचमत्कृति, तालबद्धता, यमक वगैरे पद्यांतील अनेक गोष्टी आपापल्या परीनें कारणीभूत होतात. किंवा पद्याच्या अंगीं गद्यापेक्षां इतके गुण अधिक असल्यामुळे, कलाविलास 'करमणूक याकरितां मनुष्य गद्यापेक्षां पद्याचाच स्वीकार अधिक तत्प- रतेनें करील यांत काय संशय ? आतां गद्यांतहि लघुकथा, कादंबरी, नाटक वगैरे लिहून कलाविलास किंवा करमणूक करतां येते. पण सर्वांत संक्षिप्त