पान:पद्य-गुच्छ.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विरहिणीची प्रणयपत्रिका टेकोनी बसतांचि नेत्र मिटती जाते निशा संभ्रमी स्वप्ने इष्ट अनिष्ट फार पडुनी अस्वस्थ होतें श्रमी देई धीर मनासि आजवर मी झाले प्रयत्न वृथा चोरी काय मला जिवास कथण्या माझ्या जिवाची कथा संकेतावधि खास सर्व सरली आतां घरीं या गडे द्या ना! दर्शन सत्वरी उचलुनी घेवोनि सोन्या कडे २ [ विलायती नमुना ] शुद्धाद्वैत रे माझ्या छकुडचा सुवर्णतुकडया प्रेमी गडचा सौंगडया ये धावोनि असाच ये मजकडे चौखूर टाकी उडचा लोळे स्वर्गसुखों जरी निशिदिनीं मी लूट वाटे करी थोडे से चुकल्यापरीस गमतें कीं तूं न वांटेकरी आधी अंथरुणावरोनि उठतें आठांतवांच्या पुढें सांगे डॉक्टर की प्रभातहिम तें हो नाजुकां वावडें पेले मांडुनि बैसतें मग चहापानास मेजावरी देतें बैसवुनी समोरच तुझ्या खुर्चीमधें मांजरी जातें पुस्तकसंग्रहालयं तदा शोधीत कादंबन्या ज्या लीलाप्रणयप्रकर्ष कथिती त्या भासताती वन्य वाटे वाण मला तुझीच परि कीं वाचून दाबू कुणा माझ्या पादतला समीप जरि तूं ध्यायासि ना लोळणा जातां जात नसे तिपार म्हणुनी मी आडवी होउनि पर्यकी भर तास दोन पडतें निद्रेसि आलिंगुनी माशामच्छर वारिता कर तुझा नाहीं म्हणोनी मला ये ना झोंप तदा सुदीर्घ सख्या मी आठवीतें तुला होतां ऊन्ह कमी क्लवांत निघतें क्रीडार्थ मी जावया माझा ओव्हरकोट बॅट नससी सांगाति तूं ध्यावया ६९