पान:पद्य-गुच्छ.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६८ पद्य-गुच्छ सोन्यानें घर शोधिलें सकळही दारी उभा राहिला रागानें झिडकारला मधुर जो हातांत खाऊ दिला पोटीं भूक परी उपोषण करी पाठीं निजोनी कण्हे येणें होउनि घास घालिति मला जेवीन तेव्हां म्हणे वासाची फुलली फुलें तरतरा फोफावल्या मंजिण्या आलासे भर चंपकादि तरुंना तैसाच तो मोगन्या उद्यान शिरतें परंतु कुमुमां ना धैर्य ये तोडण्या अत कवणा विचार मनिं हा देई मला डागण्या केले हार परोपरी सुबकशा माळा तशा गुंफिल्या झाल्या व्यर्थ करंडकी रचुनियां पूजार्थ ज्या ठेविल्या की पुष्पार्थ मला करील न कुणी प्रेमोद्गमा याचना शोभे पूजनकर्मि जी खुदयिता देवप्रिया आपणां पोथी वाचुनियां जपासि बसतें ध्यानस्थ मी होउनी बोटें चाळवितें तरी न सरती माळेतले ते मणी देवाचें जरि नाम घेइन म्हणे येतें तिथे आपुलें घेतां तें मन लाजवोनि म्हणतें हैं काय गे हा खुळे पूजामंचक मोकळा बघुनियां देवगृहाभ्यंतरी शुन्याकारचि तें गमे मजपुढे मूर्ती उभ्या त्या जरी माझे देव पती न अन्य मज तत्प्रीत्यर्थ पूजार्ह ते प्राणावांचुनि देह मंदिर गमे तैसेंच मातें रितें घेतां घास मुखीं गळीं न उतरे अर्धाहि पाण्याविणें हातें वाढियलीं न आज तुमच्या पात्रांत की भोजनें खातां आवडता पदार्थ उरतो गोविंद-नामें मला प्रेमोच्छिष्टविभाग ठेवित असां तो आज ना लाभला शय्येला पद लागतां कर पुढे हो पादसंवाहना कोणी नाहीं तिथे बघोनि मजला ये दुःखसंवेदना