पान:पद्य-गुच्छ.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६६ पद्य-गुष्ठ कंकतसम फिरवूनि त्यामाजि मम करा सेविन कध सौख्य अनिर्वाच्य परि खरें ? काव्यामृत गायन रस तव पितां पितां स्वैर चित्र आलापहि मधुनि सेवितां कधि येइल वेलाभर मम सुभाषिता पौर्णमासपूर्णकला विभुकरें ? ३६ गणेशचतुर्थीचें चंद्रदर्शन शुक्ल भाद्रपदि चंद्रकोर चवथिची पाहिली गडे किंचित मुरडुनि पदरांतुनि जंव बघितलेंस मजकडे चंद्रहासला म्हणुनि गणेश तया शाप जो दिला बाधा त्याची दळणार कशी चिंता पडली मला शाप सफळ होणार होउ तरि असाच घरच्या घरीं यावा आळ परी न घडावी परक्याची चोरी घडे कसे हैं अशा विचारों मग्न राहतां मला तुझिया चित्राकडे पाहुनी विचार सुचला भला शयनि अंग टाकतां झोपलिस झोप न मज आली चंद्रदर्शनापराधनिष्कृति सर्वेचि मग केलो. ओष्ठ लावुनी हळूच माझे तब नाजुक गालां चुंबन केलें परि तव निद्राभंग न तो झाला. निद्रित - जन-मुख - चुंबन यातें सुजन म्हणति चोरी शापग्रस्त म्हणोनि न उरली मजला गति दुसरी चौर्यकर्म हे घडले परि मज देइल कोण शिवी शाप सफळ व्हावया अवश्यचि अपकीर्तीहि हवी