पान:पद्य-गुच्छ.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६४ पद्य - गुच्छ ३३ वेषभूषा रचिसि वेषभूषा ? अथवा कुसुमचापपाशा ? सुटले काळे केश मोकळे तैलबिंदु त्यां वरती विचरिशी मग हस्तिदंतमय कंकत घेउनि हाती रचिसि केशभूषा ? अथवा कुसुमचापपाशा कुरळ कुंतलां स्वैर बालकांपर आंवरुनी ठायीं उन्नतिमार्गे हळूहळू रिझवुनि नेतां श्रम तुज होई रचिसि मौलिभूपा ? अथवा कुसुमचापपाशा ? पेड पिकांचा वकुनि बांधितां ऐटदार बांटोळा शिवपिंडीतें वाटे वेढी सर्पराज जणुं काळा रचिसि वेणिभूपा ? अथवा कुसुमचापपाशा ? अर्धोन्मीलित कुंदकळयांचा गजरा वालिसि वरती गमतें गिरिशिरिं गंगामण्डळ घरि रवि-किरणें कांती रचिसि पुष्पभूषा ? अथवा कुसुमचापपाशा ? स्थिर तर्जननें सुरम्य कुंकुमतिलक लावितां भाळी रक्त गोल जणुं प्रभातरविचा प्रकटे प्राची मूळी रचिसि भालभूषा ? अथवा कुसुमचापपाशा ? रत्नमुद्रिकामंडित अंगुलि ईची करुनि शलाका विशाळ निर्मल नयनसंपुटी काढिसि कज्जल रेखा रचिसि नेत्रभूपा ? अथवा कुसुमचापपाशा ? भूषाभूपित देहयष्टि मग वबसी जयिं आदर्शी प्रतिविबातें बिंब तेवि मम मन तव मन आकर्षी रचिसि वेषभूषा ? अथवा कुमुमचापपाशा ?