पान:पद्य-गुच्छ.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५४ पद्य—गुच्छ कंटक वेली अन्य उगवल्या खडे पसरले भवती कीट विपारी रचुनि वारुळे उम्र जेथ वावरती काळ न गेला बहु इतुक्यांतचि रसिक एक नर आला निरखुनि निरखुनि मजला पाहुनि मुदित मनों बहु झाला धरुनि करिं तयें कौतुकदर्शक नयनप्रसाद दिधला गमले मजला स्तुति- भारत मम निमिषार्थी तो वदला प्रसन्न झालें प्रमुदित हृदयें स्नेह वरियला त्याचा सुसदृश योजन सुगुण एक तर होय खरा धात्याचा २९ कांटेरी गुलाब अहा ही दैववशे लाधली विपिनीं फिरतां अवचित मजला कंटककलिता कळी करिं धरितां देई दिव्य गंधपरिमळा उघडितां नयन करि प्रेमदृष्टिसोहळा ओष्ठासि देतसे स्पर्शमोद आगळा स्नेहसागरा संचित करिते वाटे प्रतिपाकळी परिवेष्टन ईचें दुःख फार देतसे विषकंटक हस्ता ठायि ठायि तो इसे नैराश्य येउनी जडत मनाला पिसें स्थिति ऐशी ही रक्त आटवी अन्तःकरणा पिळी तुज मान्य असे हे अमान्य अथवा कसें दिल खुलवुनि कलिके! बोल तुझें मन जसे रक्षणार्थ देसी दास्यमूल्य कीं असें ? परवशर्तेतुन मुक्त कराया तुजसि न कां कुणि बळी?