पान:पद्य-गुच्छ.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विचित्र वल्ली जल वेलींचे सुबक गालिचे ठायि ठायिं पसरीले सुवर्णकमलाचे सिंहासन त्यांत एक वसवीलें सुरम्य माझी वनस्थली जणुं नंदनवन स्वर्गाचं कौतुककारण यक्षसुरासुर किन्नरवरवर्गाचं स्वरूप माझें दिव्य कांतिला उपमा न मिळे भुवनी तारे बघती टकमक मजला अपुल्या मौक्तिक नयनों असो; एकदिनि कमळ - सुखासनि लीलेनें मी बसले असतां सरसिजळी मुख बिंबित पाहुनि हलु मी हंसले स्मित वदनाची सुंदर शोभा बघुनि धन्यता झाली परि दु:खाची तीक्ष्ण वेदना हृदयं तत्क्षणी आली नयनं अश्रुज उभे राहिलें एकवार मी फिरुनी विमल जळामधं विं पाहिलें धैर्य कसें तरि धरुनी बिंदुपूर्ण मग दृष्टि चहुंकडे समंतभागी दिली असारता त्या शुष्क वनाची दुःखद मजला झाली शिव शिव सुंदर रूप फुकट हैं कांहीं गुण न तयाचा असदृशयोजन दोष केवढा अरसिक जड धात्याचा रस-रसिकांचा वियोग करणें याविण जगतीं नाहीं घोर निंद्य अक्षम्य असें हैं पातक दुसरें कांहीं रसगुणभोक्ता रसिक भूतली एकचि मनुज प्राणी सृष्टयद्भुतता सफल कराया अन्य समर्थ न कोणी पाहुनि माझें रूप तयाच्या नयनांतुनि जरि पडला संतोषाचा किरण एक तरि लाभ बहू मज घडला खेद वाटला मनिं मग सोडुनि शीघ्रवनस्थलि माझी स्मशानभूमीपरि मी आले येथ उपवनामाजी गार लता ही मम आवडती वेष इचा मी धरुनी उपवनिं बसले नम्रवदनशी कृशतनु एका कोन ५३