पान:पद्य-गुच्छ.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५२ पद्यगुच्छ २८ विचित्र वल्ली सर्वांगां वन वेलिशी जरी गमे मी प्रेक्षका ती नसें मायावी मम रूपरंग तुझिया नेत्रांसि वंचीत से पाहोनी मजला कुतूहल तुला वृत्तांत माझा खरा ऐकाया तरि सांगतें हृदयं या गूढासि दे आसरा सकल वनस्पतिगण ही माझी प्रजा असें मी राणी वनभुवनाचें राज्य करित जणुं अमरपुरी इंद्राणी हिम पुष्पांच्या माला शोभति विशुभ्र ज्यांच्या शिखरीं हरित लतांच्या ध्वजा फडकवी मंद वायुच्या लहरी नीलवर्ण ते प्रचंड पर्वत रोधिति अष्ट दिशांनी गति कोटासम निवासमंदिर असें बसे मम रानी भूत भेदुनि सहज काढिती ठावची पाताळाचा मुळे जयांची शिखरें ओढिति मुगुटहि आभाळाचा प्रचंड ऐसे पादपनायक जेथ पहारा करिती सकल वन्य पशु नम्र आचरिति जेथ सुसेवकरीति पक्षिकुले किति नागरिकांसम सुर्खे वसाहत करुनी मदाश्रयें संसार थाटती प्रजाभाव मनि धरुनी कोकिल बुलबुल कीर पारवे रुचिर फळें मम खाती गोड गळानं कीर्तिगायनें कृतज्ञतेनें गाती महस्रपरिची फुलें प्रतिदिनी उमलुनि परिमळभा वासित करुनी टाकिति माझें वनस्थलीपुर सारें भृंग विलासी उद्यमरतशा फिरति मक्षिका वेगें मकरंदाची सार्थकता बहु करिति खरी विनियोगे स्फटिक कांति जळ कांच तयानें महाल माझा रचिला शैवालावृत शिलाशकल या सुखासनांनीं खचिला