पान:पद्य-गुच्छ.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

4286 ५१ मोहरलेला संभव ( अहाहा, मग असेंच व्हावें ) प्रेम समगुण स्वयंवरित पति मिळवुनि आनंदानें जीवन सौख्यें भोगुनि संसारातें स्वर्गपदा ने ( पण, हाय हाय, न जाणो असेंहि होईल ) लोभी जनकें मैंदा विकुनी 'राख' तियेची केली भोग्य वस्तु संग्रही पतीनं दावणीस वांधियली पूर्वसंचितें गुरुमुख लाभुनि सद्विद्या तरतरली! ( अहाहा, मग असेच व्हावें ) भक्ति विरक्ती वरूनि दावितो मोक्षमार्ग जगतात जैसा प्रेमळ पिता सुताला जपुनी धरुनी हातें ( पण हाय हाय, न जाणो असंहि होईल ) वादविवाद शिणविल जगता ज्ञान मिरवुनी खोटें प्रज्ञा-प्रतिभा - प्रसाद पावुनि ललितकला तरतरली ! ( अहाहा, मग असेच व्हावें ) अरूप आणुनि रूपा सगळे रचील नवविश्वातें भोगिल ब्रह्मानंदोपभ सविकल्प समाधि-सुखातें ( पण, हाय हाय, न जाणो असेंहि होईल ) शीला मळविल मानुषतेच्या सोडुनि सकल व्रीडा जशी सूकरी सहचर घेउनि करी कदमों क्रीडा