पान:पद्य-गुच्छ.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

.४६ पद्य - गुच्छ २५ माझा आवडता फकीर जेउनि खाउनि सुखें बैसलों रात्रहि दस घटका झाली तंव फकिराची दीर्घ हांक ती नागमिथिं ऐकू आली न करिं याचना न करि वंचना आशीर्वाद फुका देतो • भिक्षा मागुनि जरव राखितां धनी जगाचा हा दिसतो जसा एकला जगी उपजला तसाच अजवरि तो राहे पुत्रकलत्रे स्नेही चाकर यांचा बंध न मुळि साहे अन्य उपाधी कांहिं न जाणे देहावाचुनि सुखदु:खा स्थान न उरलें 'अल्ला' नामा शिवाय इतर न येत मुखा जसा पाहुणा दो दिवसांचा तटस्थ हा तैसा असतो भिक्षा मागुनि जरब राखिता धनी जगाचा हा दिसतो जरी विरागी प्रपंचविन्मुख न करि जिवाचा कंटाळा ज्या देवानें निर्मियले त्या सहज न म्हणतो का पाळा ? क्षुधा तृषादिक देह धर्म हे जनरीतीनें वारावे याच हेतुनें केवळ खाउनि पिउनि पुष्टता तो पावे परि रुचि अरुची गोड कडू हा विवेक किमपि न मनिं करितो भिक्षा मागुनि जरब राखिता धनी जगाचा हा दिसतो जीवावरती लुब्ध असति जे त्यांचे प्राण हरायाला विशेष गोडी मनीं वाटते क्रूर दुष्ट यमरायाला मृत्यु भयातें हा नच जाणे; चाड त्या न या जीवाची चित्रगुप्त मग पान काढूनि फुकट कशाला हो वाची नव्वद झाले वय फकिराचें सदा निरोगी तरि असतो भिक्षा मागुनि जरव राखिता धनी जगाचा हा दिसतो दिवसवेळचे प्रहर चारही निवांत जागा पाहोनी अंधारामधि सुर्खे चालवी ध्यानीं 'अल्ला' आणोनी