पान:पद्य-गुच्छ.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धन - निंदेची निंदा आपण होउनि न करी घात कुणाचा कधीं धन बिचारें वडला कधीं अपव्यय तरि जाणा जाहलाचि अविचारे प्रेमळ गृहिणी हस्ती अग्नि करी अन्नसिद्धि रुचकरशी परि तत्सहाय घेउनि जाळी परगृहचि दुर्मती विवशी सच्छील अग्निहोत्री जोडितसे पुण्य पेटवुनि कुंड घेउनि अग्नि तयांतिल जाळी जग 'सत्यशोधकी ' पुंड धन निर्दोष म्हणा वा निर्गुण. दे फल तया जशी आज्ञा सेवक मनुज- करी तें उल्लंघाया नसे तया प्राज्ञा ४५ बुद्धिबळे मेळवितां धन या जगतीं नसे कुणी पापी भरल्या सरोवरं जसा ओंजळभर उदक तृषित मानव पी समृद्ध जग असें हें निर्मियतो देव मानवासाठी पितृधनचि जीवयात्रेकरितां बांधोनि घ्या तुम्ही गांठीं उद्योग - दैवयोगें सद्वांछेनें धनासि मिळवोनी सद्व्यय त्याचा करितां नांव न ठेवी तुम्हा जगीं कोणी धन औषधी रसायन, संतोष तयास मुख्य अनुपान संतुष्ट मानसा दे सम सौख्या धन असो अधिक ऊन