पान:पद्य-गुच्छ.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४४ पद्य - गुच्छ २४ धन - निंदेची निंदा ++ प्रवृत्ति विषय जो जो त्यासि म्हणति अर्थ सकल शास्त्रज्ञ 'अर्थावर्णे निरर्थक सकल' म्हणति जे विचक्षण प्राज्ञ धननिंदा मुखि भरली परि आचारें स्तुतीच जन करिती बोलावें एक असो कृति दुसरी हीच दांभिकी रीती द्राक्षे आंबट कोल्हया तेंवि म्हणति द्रव्य दुष्ट निर्धन जे श्रीमंतां अति परिचय म्हणुनि अवज्ञाचि तन्मनी माजे C अर्थमनर्थ भावय नित्यं ' हैं वदति आद्य आचार्य परि तच्छिष्य कुळाचें सुवर्ण पात्राविर्णे न हो कार्य हरिभक्तपरायण करि धननिंदा गात गात वाजवित परि उपवस्त्रा त्याच्या पाहुनि घ्या कांठ रुंद वीतवित कोट्याधीश म्हणे मज घासभर कदान्न पुरत खायाला परि रेशमी रुजाम्याविण बैठक बोचतेच पायाला कोणी धर्ममिपार्ने हरिमंदिर बांधुनी विभव दावी मूर्तिसि चढवी रत्ने सोन्याचे कळस गोपुरी लावी चुडवून विधवा पोरें धन मेळविलें जरी पिळुनी माना तरि घालितां सहस्रां भोजन न पडे कमी तया माना रावनी रात्रंदिन चाकर लोकांसि फोडितो घाम घालोनि पाणपोई फुकटचा पथिकास देइ आराम व्यवहार अर्थमूलक आधारहि अर्थ सकल जगताच धननिने मग का वनुनि कृतघ्नहि विटाळतां वाचा ? व्यक्ति असो राष्ट्र असो धनचि हवें त्यास आपणापुरतें मान धना योग्य असे द्यावा तो न्यायनिष्ठ सत्यरतें