पान:पद्य-गुच्छ.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दुर्योधनाचे शेवटचे उद्गार दोन्ही सवेंचि वमती मलिनत्व काळे काळी मसी अयश लांछन तेंहि काळे मी जाळिले सुगुण सज्जन सत्य सा मी जाळिले मुह इष्टहि आप्त प्यारे स्वत्वासि आहुत करोनि सुतृप्त केला आशाग्नि जो हृदयं या भडकोनि गेला कोठें सखा शकुनि कल्पक इष्टवादी कोठें सुयोध मम कर्ण अरिप्रभेदी भीष्मादि साहच करणार पुराण वीर ज्यांच्यापुढे थरथरे रणिं काळ थोर ते गुंतले मजशि सौहृद रज्जुपाशें मी ओढिलों नियतिकल्पित सर्व नाशे श्रीदासि राखनि सवें मज सर्व आले माझे कपाळ फुटके इतरां फळाले मी कालकूट विषबिंदु महा जहाल पीयूप गोड भरलें जगि जे रसाळ तें टाकिलें कटु कषाय असे करोनी उद्गार केवळ करीलचि जीवहानि जैसें 'सुदूर क्षितिजी जळ तें मृगाला आकर्षि राज्य धनलोभ तसाच माला सूर्यास्त नाशित अवास्तविका जळाला हा घोर अंतहि तसा मजलागि आला ६५