पान:पद्य-गुच्छ.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दुर्योधनाचे शेवटचे उद्गार हे सर्व गार पडले मम हातपाय काळीज चंचळपणा बहुसाल दावी जैसी क्षगोक्षणिं तडित तळपोनि जावी ये स्मृतीपर पुन्हा परतोनि जात नेणें असेंचि वरचेवर काय होतें ज्या देखिल्या कधिं न पूर्वि अशा विचित्र नाना चमत्कृतिहि अंतरि पाहि नेत्र आत्मा जणों वितळला जळरूप झाला ब्रह्मांडगोल अवघा द्रव निघाला को आरसा हृदय है मम आज झालें त्यांतून विश्व प्रतिबिंबित आंत आले मी कोण ? मी नृप सुयोधन कौरवांचा ? हें सत्य ना ? भ्रम पडे मज थोर साचा हो मीच मी अखिल कौरवलोकनाथ हा हाय, हाय, स्मृति कां परतोनि येत कोठें असे मम पुरी मम राजधानी ऐश्वर्यपूर्ण मणिकांचनरत्नवाणी हैं काय मी चहुंकडे वन दाट पाहें जैसे स्मशान बहु घोर तसें दिसे हैं प्रासादगोपुर विलासगृहें अनंत दीपावली चमकती मणिपात्र ज्यांत स्पर्शेच जे गुदगुल्या करिती बिछाने झाले अदृश्यचि कसे निमिषांत नेणें प्रावि मौक्तिक फळे वहु झालरीला वेलीत पाचुकण शोभविती जयांला ते विंझणे बहु सुगंधित चंदनाचे ज्या वारितां युवतिचा कर गोड नाचे प्राणाहुनी अधिक जे ममता करीती ३३