पान:पद्य-गुच्छ.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२ पद्य - गुच्छ १९ दुर्योधनाचे शेवटचे उद्गार अस्तास जाउनि दिवाकर काळ झाला अंधार घोर भुवनीं गगनीं रिघाला ऐश्वर्य सर्व सरलें गमतें दिनाचें आपत्तिरात्र अतिभीषण नाच नाचे हे वृक्ष पर्वत तशा सरिता महा या ज्यांतें सुहास्यमय जीवनतेज द्याया सन्मित्र तत्पर तथा कळिकाळ नेतां शोकांधकारं जणूं मग्न लवोनि माथा झाली अनाथ पृथिवी करुणार्त खिन्न डोळे मिटोनि रडते जणुं ही सुदीन गाळीत सांद्रनिविडासितपक्ष्म-वाटे दुःखाश्रु संतत अहा दंवबिंदु मोठे आकाश-अंगण विलिंपित काजळानें ऐसेंच भासवि मला घन हा बळानें शिंपीयला वरि सडा रुधिरोदकाचा संध्या सुवर्ण बघुनी ग्रह हो मनाचा नक्षत्रपुंज अणुरेणु जसे विकीर्ण त्यांचा बघोनि बहु उज्ज्वळ शुभ्र हाडें चुरोनि गमतें जगू चूर्ण केली रंगावळी विविध त्यांतुनि काढियेली निःष्पंद निश्चलचि या जरि विश्वकाळी गंभीर नाद भरला मम कर्णपाळों हा एक मात्र करि किर्किर कोण नेर्णे याचें मना गमत काय किं गोड गाणें भाळीं स्रवे हिम करा मम थंड काय वर्ण