पान:पद्य-गुच्छ.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देशमातेला शेवटची विज्ञप्ति न्यासें न लाभ कसला अवघेंचि ओझें अर्पूनी देह तुजला परलोकिं जातां प्राणप्रयाणसमयींहि मला न चिंता होणार सत्य अपुला शरिरें वियोग होवो; प्रसिद्ध दुरतिक्रम दैवयोग ठावें मला प्रणयरज्जु जरी असारा अंगावरी परतवी तरि वज्रधारा मी चाललों तरि उरे मम नांव मांगें जें मत्कथा विविध या जगतासि सांगे तैसीच भोगियलि दुःखपरंपरा जी ती ठेवण्या स्मरणचिन्ह म्हणोनि राजा केले अनंत अपराध परोपरींचे होवोनि मानवश सर्व तुझ्या अरींचे ठेवूनि जागृत अमर्षण वैरभाव दुष्कीर्तिदूषित गमे करितील नांव होतां तसें जननि तूं रडशील काय ? मातें स्मरूनि करुणे म्हणशील हाय त्वन्ने अश्रु जरि एकचि एक आला ती दूषणें तरि समर्थ पुसावयाला जो काय लोभ अवघा हृदयांत होता तूं एक तद्विषय नैव दुजा पहातां माझे विचार सगळेहि तुझेच होते या आपुल्याच मुखिं काय कथं अगे ते स्वातंत्र्य उज्वल तुझे दिन वैभवाचे मी दैवहीन बघण्या न कदापि वाचे जे कोण पुत्र असती तव दैवशाली त्यांच्याच तें सुख असे लिहिलें सुभाळीं थ. म. द. पा. पोतदार, ग्रंथ संग्रह ३१