पान:पद्य-गुच्छ.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ पद्य—गुच्छ १५ रायगडावरील हिरकणी बुरुजाचा पोवाडा कोकणी बांधिला गड नाम रायगड उंच अवघड चढावया उतराया बघुनि तो जहाला खूप मनीं शिवराया- जी आवाज सोनदेव वदे अंतरों मढ़ें " मी अभेद्य बांधियला दुर्गेद्र होउ द्या इथ मन्हाठी साम्राज्याच केंद्र "- जी फोडोनी फत्तर घणी गवंडी गुणी उभविती झणीं जयध्वज पापाणी हा स्वर्ग ओरडून कथील शिवविक्रम काहाणी-जी चौबाजू संगिन तट रुंद बळकट मुंगिला वाट आत मुळी ना गवस वरि समंद घाली घस्त दिला त्या घोर बळी अवस-जी या किल्ल्या एकच दार निरुंहि फार मागें अडसर तयाच्या लोखंडी दो बाजूस बुरुजावर ' भांडि ' अन् दारु खंडी खंडी-जी रातीच्या पहिल्या पारी पहारेकरी वेशिच्या दारि अडसरा ओढुनीया राहि उभा पाहाच्या सिद्ध तरवार हाति धरुनीया - जी रावता बंद मग करी आत बाहेरी दुरूनच हेरी ना कुणा येऊ दे जवळी अतिप्रसंग करि त्यावरी धार पट्टयाची सळसळी - जी मग एकदिनी वर्तल नवल तेंभल ऐका सगळ शिवराय ठेवूनी चित्तीं आवाज सोनदेवाची झालि कशी फटफजिती-जी