पान:पद्य-गुच्छ.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अर्पणपत्रिका फेंकुनि घोंटा ठांसुनि दोरे नीतिपटहि जो बनला रक्षण करितो राष्ट्रदेह तो निवारुनि जला अनला दूरदर्शि तूं कृषीवल जसा बघतां ढग आकाशी निघास उद्यमा शकट जोडुनी सुदृढ रज्जुमय पाशीं नांगरुनी कुळवोनी पेरुनि तृण हस्ते काढोनी मोट हांकुनी वाफे भरुनी पिकास पाजिसि पाणी पडति पोठया तेव्हां हांकुनि कीटक पशुपक्ष्यांना निवारिसी बेकार भिकान्या सोसुनि अपवच नाना मग जयि पेटे धुमी आगटी हुरडा चोळुनि खाया लावुनि नातें म्हणे पाहुणा 'येत आलों' ' या या ' असो, ईश्वरें शेत पिकविलें काय कमी मग होई कोणी खावो कोणी नेवो कोणी तुडवो पायीं राष्ट्रकार्य ही कृषि निरपेक्षचि करूं आपुल्या धर्मा काय फायदा ध्यानी आणुनि मग इतरांच्या वर्मा मुसळधार भावना - मेघ जरि या भूशिखरिं न पाडी हार्दिक जलरस पोशि पिका त्या फार येतसे गोडी महाराष्ट्रा- जित्या राष्ट्रा ! तुजला तिलतर्पण (!) सत्पुत्र करिती त्यांना, कौतुकें ग्रंथ अर्पण ! २१