पान:पद्य-गुच्छ.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६ पद्य—गुच्छ १२ महानुभावप्रशस्ति नयन सलिलें झाले ओले गळा बहु दाटला वच नच फुटे वाग्धारेचा झरा जणुं आटला ! हृदय भरलें आनंदानें अशी गति जाहली सदयहृदया तुम्हां पाहोनियां अजि ये स्थळीं विनतिवचना या मित्रांच्या तुम्हीं बहु मानुनी परिणतत्रया अश्वक्लेशा मनीं नच आणुनी सुदिन अजि हा या भेटीचा प्रमोदक आणिला उपकृति महा ती या वर्ण न ये मम वाणिला सुकृत अमुचें तें पूर्वीचें असे लय पावलें विधिवल अम्हां दुर्भाग्याना पराङ्मुख जाहलें कठिण समयी या उद्धर्त्याविना अमुची गती परम हत या भावें देवें दिली आपणां मती ! विविधविषयों प्रेमाचें जें निबंधन वर्ततें जडत बहुधा अंतर्भाव उपाधियों न तें ठसत हृदयीं या वाक्याची प्रतीति हि वाणुनी सुदृढ अपुला प्रेमा आम्हांवरील विलोकुनी श्रम करितसां उद्धाराया उदात्तमहामते तनमनधनें या आर्याच्या महीस उदार ते त्रुनि भरती प्रेमाचे समुद्रहि अंतरीं विमल जलसंकीण नेत्रां कृतज्ञपणा करी अमित उपकारांचे ओझें शिरी अमुच्या पडे अनृण अपुलें कैसें व्हावें पडे मज सांकडें सुजन करिती सत्कार्यात अहेतुक ते जरी उपकृत जर्ने फेडावें हो सुनीति कसे तरी