पान:पद्य-गुच्छ.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

'डोंगरी' महात्म्य वर्णन उपकृतिस्मरणानें येइ जी बाष्पधारा धरूनि कुसुमहारीं अर्पु आम्ही उदारा वरूनि सुमनगंधे युक्त पुष्पोपहारा विनति करित आम्ही द्या मनीं नित्य थारा अश्रांत श्रम ते करोनि सदया सत्कार्य आरंभिलें हैं राष्ट्रोन्नतिबीज शिक्षितमनःक्षेत्रीं तुवां पेरिलें सेवीं बाल तरुवरील सुमनें जीं आज हीं अर्पिलीं ती राहोत समीप नित्य तुझिया सद्भावचिन्हें भली १३ 'डोंगरी' महात्म्य वर्णन इहलोकीं दरबार यमाचा अनुदिनिं कारागृहं भरतो पापपुण्य झडतिला निघोनी मनुज मोकळा तो होतो प्राकारावृत पुरी डोंगरी अन्वर्थक हें नांव तिला उंच उंचशा भयाण भिंती पहाडसम चौबाजूला कभिन्न काळे दरवाजे ते दोन दिशेला असति उभे मेघडंबरी त्यावर केली मेघशबलशा नीलनमें समंत भागों वस्ति दाटली जशा वारुळामधिं मुंग्या परि अंतरि शून्यता राखिती उभ्या संगिनी त्या नंग्या जरी म्हणावें स्मशान येथे हात पाय तरि वावरती सदन म्हणावें तरी मनुष्यें मुकीं भुतासम आचरती सदन म्हणा वा स्मशान येथें सदा नांदतो यमराजा परलोकाचा अनुभव देई मनुजा चालू न दे गमजा द्वारामार्गे द्वार लागलें प्रवेश दुर्घट तो मोठा वर्दी देउनि उभे रहावे घटका दो घटका घंटा यमदूताच्या संगति वांचुनि संचारासी वाव नसे शुक्लकाष्ठ पाठिचें पाठिशी सदा लपेटुनि तें बैसे १७