पान:पद्य-गुच्छ.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१० पद्य - गुच्छ ८ सरस्वतीचा वाल्मीकिकवीस आशीर्वाद नांव असे मम सरस्वती मी वीणापाणी देवी नांव आद्यकवि तुझें वाल्मिका कथितें होइल केवी आले जगतीतळीं तुजसि गा ! शिकवाया गानातें पाषाणाची मनें वितळतिल सहस्र ऐकुनि ज्यातें ज्या गाना तें ऐकुनियां तव हृदय कठिण तें द्रवले तेंचि कंठि तव सदा सर्वदा राहिल वाल्मिकि ! भरले गान ऐकुनी तव काव्याचें तव चरणीं लागोनी गंभीर सिंधू रडेल चंचळ प्रेमभरें होवोनी दिपाळांच्या रमणी तुजवरि ढाळितील अश्रूंतें आनंदाने मुग्ध होउनी विमल सुधारापातें तारागणही शिरीं गाळितिल शुभ्रजळाचे बिंदू अशनी वितळुनि होतिल त्याचे प्रेमरसाचे सिंधू ज्या कारुण्योदधिमधि वाल्मिकि आज बुद्बुनि गेलासी त्यांतचि जगता स्वयें बुडविशिल सत्य होय हा आशी जोवरि गिरिवर असे हिमाचल उभा सृष्टिच्या पाठी तोवर राहिल अखंड तुझें नांव जनांच्या ओठी जोवरि पृथ्वीतली वाहते पवित्र गंगा माता तोवर राहिल तव काव्याचा प्रचंड ओघ वहाता अमर होय तत्र काव्य सुरापरि रविशशि नवग्रह तारे सत्य समज तव कीर्ति पूर्वि हे विलया जातिल सारे अनंत कालावधिवरि वाजत राहिल तब ही वीणा तूंच आद्य कवि अंत्य कविहि तूं सदैव कविकुल राणा