पान:पद्य-गुच्छ.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पद्य-गुच्छ मृदुल सैकत शशीपरि धवल जेथ चमकते सुरस्त्रियाकुचकुंकुम चंदनगंध ज्यांत वाहते हरिचरणाची भूलि पुण्यकर असे ज्यांत मिसळली हिमाचलाच्या गुहा विदरुनी भूवरि ये खाली पापहारि तें तरंग चंचल पुण्यद जल गंगे पावन करूं दे प्रतिदिनि माते! दुर्गेचीं अंगें ७ गंगातटाकावरील उषःकाल उजळुनि अष्ट दिशा रविसारथि हळुहळु हि येतसे उद्या प्राचमुखि बहु खुलली रम्य छटा फिकट गोड रागमया पावू लागलि हळुहळु भंगा जी शांतता त्रियामभरी बसली होती व्यापुनि गगनांतरिं तेवि सर्व पृथ्विवरी काळत मोमुखि पडले दडलें जें शून्यता- उदरकुहरी वाटे अरुणकरच उद्धरुनी सकल विश्व मुक्त करी किंवा गतदिन रविपति सिंधुजळीं मग्न जाहला बघुनी प्राणव्यसनी जाणुनि पडली मूर्छित नितांत खिन्न मनीं त्या पृथ्विकामिनीप्रति रविवार्ता कुशल अरुण समजवितां वाटे सावध होऊं लागे तद्वदनिं येत ही शुचिता की तम-चांडाळाच्या स्पर्श अपवित्रता भुवन भोगी पावनता त्या द्याया सकरुण सरसावला अरुणयोगी रवितंज- तीर्थ नभपुटकमंडलूमतुनि काढुनी हाती प्रोक्षणविधि करि तो तंत्र विनटे भुवनांग सर्वही कांती रवि पश्चिमेस जातां भूलोक न्यस्त करित जेंवि धना प्रत्यर्पुनि तो रविकरि दिक्पालहि अष्ट जाति स्वस्थाना