पान:पद्य-गुच्छ.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गंगास्तोत्र ६ गंगास्तोत्र माते भागीरथी ! वंदिते कर जोडुनियां तुला जन्मजन्मिचें पातक धुउनी करि तूं पावन मला तव तटिं वसतां तव जळ पीतां लाटांवर लोळतां नामहि घेतां मरण येउ मज लाभ न यापरता तब तीरावर वृक्षकोटरी वसणारा खग बरा तव जलवासी मत्स्यकूर्म वा धन्य मानितें खरा नको नको तें तुझ्या संगतीवांचुनि जरि लाभलें अन्य ठायि सिंहासन नृपपद गमत न मज चांगले स्तुतिपाठी बहुभाष भाट कवि यांच्या सुरस कथा चंचल पैंजण कंकण - किंकिणि गोड शब्द ऐकतां चंदनचामर हातिं घेउनी घालिति वारांगना शीतल पवना सेवुनि सुखवी अनुदिनि जो निज मना अशा नृपाळा हुनिहि वाटते कीटकयोनी बरी सर्पतुरगगजपक्षी यांची स्थिति किति सुखदा तरी हृत शव माझें तव प्रवाहें क्षणभर जरि वाहिलें तटजल अथवा पुलिन यांत तें एकवार घोळलें तरंग हिंदोलावर किंवा जरि तें आंदोळिलें सुरस्त्रिया मग चमन्या वारुनि करुनि टाकितिल भलें चरण विष्णुचे कमल तयांची तंतुवल्लि ही असे शंभुशिरीं रुळणारी अथवा मालतिमाला दिसे जिनें टाकिला धुउनि कलीचा कलंक सारा अशी मोक्षश्रीजयपताक करु ही पुनीत गंगा मशी निबिड ताल तरु तमाल सालहि अन्य विविध वेली रविकिरणांचा ताप वारुनी धरिति जिथें साउली