पान:पद्य-गुच्छ.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७) येतो तो अभंग आर्या, साक्या, अशा मात्रा वृत्तांतील पद्यांचा अधिकच सुकर होतो. तात्पर्य, हीं पद्ये संगीताच्या मराठीकरणाकरितां केली आहेत; ती फार लहान असावी म्हणून त्यांत फक्त एकेकच मुख्य कल्पना घातली आहे; आणि ती रागाच्या नांवावरून सुचणारी अशीच घातली आहे. कोणतेंहि पद्य म्हटले म्हणजे तें गायनक्षम असतेच. तथापि या शेवटच्या भागांतील पद्ये काव्यापेक्षां गायनक्षमतेच्या विशेष दृष्टीनेच रचलीं आहेत. शेवटी ऋणविमोचनार्थ हें सांगतों कीं क्रमांक ६ हें वाल्मिकीकृत गंगास्तोत्राचें भाषांतर आहे; घरच्या मुलीबाळींना स्नानाच्या वेळीं म्हणण्या- करितां त्यांच्या सूचनेवरून हे भाषांतर करून दिलें होतें. क्र. ८ ला एका बंगाली कवितेचा आधार आहे. क्र. १८ ला थॉमस मूर या आयरिश कवीच्या एका कवितेचा आधार आहे; १९१० साली आयर्लंडच्या इतिहासाचें पुस्तक लिहिलें त्यांत घालण्याकरितां हें भाषांतर केलें होतें. पुणे रंगपंचमी शके ता. १३ मार्च १८५७ १९३६ } न. चिं. केवर