पान:पद्य-गुच्छ.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(६) अशी वेळ येत चालली असें माझें मला वाटू लागले आहे. आणि आपण मांडलेला पसारा आपणच आवरावा हे सर्वच दृष्टीनी सोयीचें नव्हे काय ? एरवी या कविता प्रसिद्ध करण्यांत, कवि या नात्याचा अहंकार मिरविणें, किंवा साहित्यिक या नात्यानें जें कांहीं अल्पस्वल्प यश मला लाभले असेल त्यांत अधिक भर घालण्याची इच्छा करणें, हा माझा हेतु नाहीं. मी मनःप्रकृतीनें विचारी, चिकित्सक, आणि विनोदप्रिय असा आहे. हे तीनही धर्म काव्यनिर्मितीला वावडे असतात. जातिवंत काव्य निर्माण होण्याला लागणारे भावनाप्राधान्य मजमध्यें नाहीं. मी फार तर विकार व विचार यांचा मेळ घालू शकतो. तथापि, " दगडालाहि पाझर फुटू शकतो या म्हणीप्रमाणे ज्यांत भावना खुलली किंवा फुलली अशा माझ्या कवितांची उदाहरणें म्हणून मी खालील देऊ शकेनः-- क्रमांक ९, १२, १५, १६, १९, २९, ३०, ३४, ३५, ३६, ३७. पण या मानानें चिकित्सक व विनोदी कवितांची संख्या अधिक भरेल यांत शंका नाहीं. 1 पद्यगुच्छाच्या शेवटच्या भागांत गायकीची म्हणून कांहीं पद्ये दिली आहेत. त्यांसंबंधी थोडा खुलासा करणें अवश्य आहे. तो असा. संगीताचें मराठी- करण' या विषयासंबंधानें मध्यंतरी मी मतप्रसार चालविला होता; व तो कांहींसा यशस्वी झाला असे मला वाटतें. हा मतप्रसार करीत असतां, त्यांतल्या त्यांत, संगीत शास्त्रांतील रागांची नावें ज्यांत गोवली गेली आहेत अशीं कांहीं पद्ये मी केली. त्या पद्यांपैकीं कांहीं कांहीं ख्यालाच्या धर्तीवर असून त्यांचें नोटेशनहि तत्ज्ञांनी केलें होतें. पण नोटेशन न झालेली अशींहि पद्ये बरीच आहेत. ती केवळ बीजरूपानें लिहिलेली असून, सोप्या वृत्तांत असल्यामुळे त्यांचेहि ख्याल किंवा इतर गायकीचे प्रकार करितां येण्या- सारखे आहेत. आणि तशीं तीं मी म्हणवूनहि घेतली आहेत. या योजनेवा हेतु हा कीं, ह्रीं मराठी पद्ये गायकीच्या थाटानें म्हणतां यावी. शिवाय रागांची नावें पद्यांत ग्रथित असल्यामुळे त्या पद्यांची चाल तोंडांत बसून इतर प्रबंध कोणी गातांना ऐकिले तर त्यांतील सूरालाप सादृश्यामुळे आपणाला ओळखतां यावे असाहि हेतु आहे. नुकतेच श्री. तांवेशास्त्री यांनी रामदासकृत ' मनाच्या श्लोकांना ' असेंच गायकी रूप देऊन 'सुबोध संगीत' नांवाचें पुस्तक छापले आहे. जो उपयोग गणवृत्ताच्या बंदिस्त श्लोकांचा करितां