पान:पद्य-गुच्छ.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राग - बागेश्री गायकी प्रबंध १ रम्यता किति देती बागे श्री लता वृक्ष हे सुंदरसे सुमनें फुललीं मधुप गण वरि डोलति है होउनि गुंग मधुर रसें राग-बिभास बिभा सकळ साठली जगांतिल या रमणीच्या नयनीं विनटे जी रवि मुखि सीमांता जातां उत्तर-अयनीं राग-बिलावल १ बिलावलि जशा पाडिति मूषक जीर्ण विजनशा सदनीं पाडीं वृद्धावस्था निर्दय खिंडारे या रदनीं तेंवि दैवगति खनित्र करुनि तीक्ष्णदंत चितेला मनुजहृदय काढितें खणोनी दावुनि कुकर्म लीला २ वीं लाव लहान आल- वाली पाडुनि रेखिव पाळी घाली मग खत पाणी उपटुनि काढी तृणमय जाळी राग - भिमपलास भीम पलाश दिसे हा रानी रम्य किती नयनाला पर्ण न फुटले एकहि परि हा पुष्पमय कसा झाला वाटे राक्षस देवेंद्राशीं करितां समर पळाला १०७ गुप्त स्थळ रक्षणार्थं शोधित गिरिकुहरांति आला वज्रें केलें घाव तनूवरि तिळहि न जागा उरली रक्तें फुटुनी गोठुनि जण हीं पुष्पाकारचि बनली राग - मल्हार मल्हार देव ये गरजत भारी मेघ वारुवरि करुनि सवारी श्याम कवच घालुनि अंगावर मौक्तिक माला अभ्रमय शिरी घेवोनि सर्वे वीज सहचरी राग-मारवा मार वाट रोखुनि बसला तरुण नरांवरि नवयुवतीवरि घालित अवचित तो घाला यौवन वन घनदाट विकट अति विवेक लोचन विफळचि होती अमोघसंधानी धनु हातीं वीर अनुभवी तो कसलेला राग - मांड मांड जगीं मांडियला दैवे विपरीत कसा हा निष्ठुरें बघुनि मन ये विषाद, मम