पान:पद्य-गुच्छ.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०६ नरनटघृत ललना रूपानें ईशचरित तें स्मरतें नटनारायण रंगभूमि हैं विश्व तयाला साजें मायेसह सजला रंगाया काय उणें मग मौजे एकाक्षर ओंकारों भरलें नाटक वाङमय सारें पद्य—गुच्छ ग्रह निज गतिनें गायन निर्मुनि गाती त्या अनुसारें राग-परज परज परज जिव्हा वदनांतरि खडगुलता जशि निष्कळ झळके लीला प्रिय ललना करीं घोर भयंकर मुखीं मुखवटा पुच्छासम उठविला बाहुटा तरि व्याघ्र न तुज कोणि म्हणे वीररसात्मक शब्दसमूहा कोशाभ्यंतर काय उणें राग- पहाडी पहाड़ी मजा करूं चला या सुप्रभात समयाला सहस्रकर रवि क्षितिजावरतीं अजूनि न जंव तो आला पक्षी गाती साद घालिती हळुहळु मधुन मधुनी डोकावीती मान काढुनी घरट्यांमध्ये बसुनी अंग झाडुनी हरिणें उठती बघतीं चौबाजूला राग- पंचम पंचम दिघला गोड कोकिळे वसंतमुख खुलवाया जनमन दु:खी उदासीन जरि तरि तो जाई वांया गानमाधुरी आत्मनिष्ठ ती कोकिळकंठीं नाहीं उष्ण चंद्रमा विरहिणीला प्रिय संगति शीतल रविही राग-वरवा बरवा बहिरेपणा दुरुक्तिश्रवणाहुनि मज उपोषणहि तें पथ्यकर नको परि उदरामधि कांटे राग-बहार वाटे बहर न तनुविटपा कां आला प्रिय सुहृदा रे सांगे सकल खरें लपवु नको विनयभरें होइ बघुनि दुःखि तुला दुःख मला यौवनसम कोण दुजा सहकारी मित्र तुझा परि तेज न ये नयनी सहज गोड हास्य वदन हृदय हरुनि सौख्यधनीं कोण घालि घाला