पान:पद्य-गुच्छ.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गायकी प्रबंध आश्रय अचल असे हा विद्वानां सहकारी, दुःखितां मित्र सुहृद् सुखभाजा राग - दीपक दीपक सत्पुत्र हा शोभवी जसा चंद्रमा गगना उज्वल करितो यश अन् कीर्ति- सुधा-विलेपनें कुलवदना पिढ्यांपिढ्यांचें सुकृत सांचुनी तेंवि फळाला येतें एका देहीं एका जीवीं राग- देश देश हा माना देवासम पूजनीय निशिदिनि देशभक्ति हा धर्म सनातन उपासना विधि जरि ते नाना राग - दुर्गा दुर्गा या करगत करा सत्कीर्ती रणि झणि वरा प्राकारा भंगुनिया हर हर हर करित शिरा कापुनि अरिशिरकमलें यमपूजापात्र भरा राग - देशी १ देशील विमल देवा इतर न कांहीं जगीं यशा जाई धनविद्या विभव जरी अगणित तरि त्यासि मान्यता नाहीं १०५ २ देशीं कृषि शिल्पोद्यम या जनते- वीण अन्य ना कोणी आधार युगि असे या म्हणुनि करा वृक्षतळ जशी भरणी ३ देशी तिल चिन्हांकित वदनांतिल गोड जीभ मम वदनीं स्वीकारुनि हा तिळगुळ तुजशीं बोलेन गोड रमणि झणि राग धनाश्री धनाश्री न म्हणा घातक लोभ मूल करवित नरकरवी अशुभ वृत्ती नाना धना श्री सात्विक भावा वरिते दिव्य गुणा तेजश्री ओज श्री पहा श्रीच्या सहज खुणा राग-नटनारायण नटनारायण राजहंस हा रंगभूमिका सारी क्रीडालीला करो आजवर जनमन रंजवि भारी गंध सुवर्णा तेवी सुस्वर अधिक गोड करि रूपा प्रेक्षकगण करभार देई त्या जैसी प्रजा न भूपा जयिष्णु होउनि विष्णु धरितसे मोहिनिच्या रूपातें