पान:पद्य-गुच्छ.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०४ नेसाया पीतांबर देती तरी दिगंबर वृत्ती मुखीं अमृतमय घांस पड़े परि वाटे ती त्या माती सुदर ललना जरि सेवेला दासी उभ्या सतत जणु होई कष्टी मानसि पिक जणु कंटकपंजरवासी मस्तक ठेवुनि जनीं उठविले घट्टे याच्या पायीं "सेवक जनतेचा मी" अन्य न मानी अपुल्या ठायीं राग- जंगला जंगला जा जरि न दे पद्य - गुच्छ ही संसृती तुज सुखा हास्यमुख बालक तुजपुढे चुंबना वांछनी मागतां गळि पडे खेळकर बालिका दुडदुडे हट्ट धरुनी म्हणे घ्या कडे अन्य आनंद जगि काय मनुजा कामिनी प्रेमळ सती लाभली दक्ष गृहकर्मी असे जी भली भूवरी देइ ती स्वर्गं सौख्या राग-झिझोटी झिझोटीची बट करि धरुनी गात सखी स्तव तीचा म्हणे सांठला ईतचि सगळा सद्गुणगण सुसतीचा स्नेह रसें भरली परि सन्मुख नित्य अधोमुख राहे प्रेमें कुरवाळल तरि नयनी कटाक्ष रोखुन पाहे राग-तिलंग तिल अंग किती शुभ्रवर्ण तव बघ हे शोभविती कर्मकुशल चतुराई दावी विधिहस्ति किती लांछन जणुं चंद्रवदनि अपवादहि व्याकरणी द्रुतगति लयमय गानी शरणागति अभय रणी दुषण भूषण द्विगुणित राग-तोडी तोडी हा प्रेमपाश कणसा जन-हृदय खुपत असिसम मम हृदय रुतत दुखवुनि तुज मजसि सतत अंति करिल सर्वनाश राग दरबारी (कानडा ) दरबारि वसुनिया हा राजा नवदाक्षिण्या ठेवुनि हृदयीं साधितसे पुर-जन-काजा पिता अर्भकां पुत्र निःसुतां बंधू अनाथ वधुला अपराध्या यम, भीति पीडिता