पान:पद्य-गुच्छ.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राग खमाज गायकी प्रबंध ख-माज घर हें क्रीडा करण्या दिलें यक्षललनांना स्वैरपणें तेथ त्या नांदती 'खेळ खेळती नाना निळी पसरली चादर तिजवर उधळिलि तारासुमनें क्रीडा कंदुक चंद्र करोनी डाव मांडिला त्यांनी लपती मेघांमागे कोणी मार वाचविति चपला पळतां शेला सावरिती कुणि अभ्रखंडमय अपुला राग- गारा गारा भरारा दाहि दिशा करिति किती मारा तडातड घडा काखेचा चुडा लाखेचा घडा मातीचा चुडा हातीचा काय करूं कोठें शिरू जवळि न वृक्ष घ्यावया थारा सासुरवासी मी दीन अबला सासुबाई रागे भरतिल देतिल दोष तो मला सारा राग- गौरी गौरीहर पूजित बाला पीत - वसन परिधान करोनी घालुनि कंठीं मंगलमाला १०३ देखिला न नयनीं जरि निज वर तरि रंगविते ती हृदय- पदावर सगुणरूप त्याचें अति सुरुचिर निज अभिरुचिचा करुनि कुंचला राग-छायानट. छायानट नटला विटप किती शुभ्र चंद्रिका प्रकाश मिसळुनि अंधकार हा करि गमति गमति शिखरं जटाजूट शोभतो हा शबल-द्युति-मय किरणसंग में पांडुर रेषा दावि विधुकला नील गमत तो सर्प वक्रगति राग जयजयवंती जयजयवंती रसवंति जय खरा तव होई जगभरी मिष्टान्नासम ललित नव रसां रसिक आदरी राग - जीवनपुरी जीवनपुरि ही किति नवलकरी अद्भुत दर्शन ईशें रचिली क्रीडा छंदें अस्थिमांसशोणितमेदांनी रचिल्या भिंती बुरुज गोपुरें राग - जोगी जोगी कोण असे हा वाटे अपूर्व मम चित्ताला सेवी भस्मासम जरि लागे केशरतिलक कपाला