पान:पद्य-गुच्छ.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०२ पद्य - गुच्छ राग काफी १ कॉफी या झोकोनी मैफलीत ये रंग न अजुनी चढतां बारावरती काटा झोप पळतसे बारा वाटा मग बैसा तुम्हि मारुनि जेठा सन्मुख सरसावोनी ओदुनि तबक पुढे पिकदाणी बागेश्री आळवितां साधी पंचम लाविल सहज समाधी मग मध्यम स्वरसाम्राज्यामधि मालकंस शिरतांना शांत रसोदधिमंथनवीची पडतिल 'तुमच्या कानीं पहाट समयीं करुण रसाला शीतळ वातें भर बहु आला मग सुचवा तुम्हि गवइ बुवाला राग परोपरीचे ते परज रामकलि ललतहि सोनी २ घ्या घास गोड गोड स्वीकारुनि नव रीती मिष्टान्ने दिलि हाती आवडिचे राग जुने तालादिक मुळि न उणें एक मात्र मोडिलि परि पुरति खोड परभाषा आदरिता पण ये संगीता निजजनवच वरुनि दिली मधुर जोड राग - कामोद कामोदय तरुणा करित मूढ बधिर अंध घालुनि दृढ पाशबंध मुळि नच येत्या करुणा मिळविले धुळिस किती आजवर तयानें बांधुनि अपकीर्ति पर्दार मळवुनिया सकल गुणां राग-किर्वाणी कीरवाणी गीर्वाणी ऐकुनि मन धालें देवा त्वां पक्षिवरा ज्ञान दिव्य किती दिघलें कर्ण नसुनि श्रोत्रेंद्रिय तीक्ष्ण जशी असिधारा ओष्ट दंत गुप्त तरी करित स्पष्ट उच्चारा जिव्हा ही लोल सकल शब्द मानवी बोले राग-केदार केदार अचल शिखरी वसति करीतो परि तो शिव जगताचे हृदयीं धरी प्रिया अपर्णा पर्णा-भरणा पुत्रद्वय ते विकृतमुखी रक्षामय गृह तरि सहज मुखी निजभक्तांचें दुःख हरी