पान:पद्य-गुच्छ.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(संगीताच्या 'मराठी करणा'करितां रचलेले) गायकी प्रबंध राग-श्री श्री देई देवा तव गुण गायन करूं अहर्निश धरुनि पूज्यभावा नादब्रह्म जरि एकरूप तें विविधरसालंकारी नटतें म्हणुनि सुलभ सेवा नारद तुंबरु अमुचे प्रतिनिधि तुझिया संनिध उभे गुणनिधी आम्हांसाठीं त्यां वर द्यावा राग- अडाणा १ अडाण्या घरी समज मनि काही जग तुजसम जडधि नाहीं त्रिगुणात्मक जग एक्या माने मोज पाहसी तूं कसा अक्षक्रीडा एक्या दानें सार्थं सफल कैसी होई २ गृहदेवता - गीत मुखि गावें लाभते तेणें मानसा शुचिता यारे गारे भा sss वें स्वर्ग भूमिवर अवतरवी सुगृहिणी स्तुतिसुमनानीं तिज पूजावें राग - असावरी असा वरी तूं वर मनुजा जाइल दुरित सकल अघ नारा घडेल निशिदिनि हरिपूजा वर वरण्या सद्भाग्य लागतें जरि ईश्वर सन्मुख झाला निर्धन परि पुण्यशील रंका सुचेल कधि हि न जें राजा राग-कानडा. १ कानडा मला पति केला मी तर अशी मराठिण बाला मी बोले तें त्यातें न कळे तो बोले तें मज न आकळे जिव्हा ओष्ठहि हलवितों बळं बोध परि कुणा कांहि न झाला दुःखभरानें, म्हणे चित्कला, पडला गळि जड देह दादला सद्गुरुवाचुनि यांतुनि मजला कोण सोडवी सज्जन वोला २ मना सुजना स्मरे ईश्वरा तरि होती सुफला मनकामना व्यर्थ उपाय जरी आधार हरिनाम ना ? ३ का न डागु ही मम रसना जरि सच्चरिती हरिगुणवर्णनि इजला रस मुळि गवसेना