पान:पद्य-गुच्छ.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुगृहिणीचा वेदान्त तृणपर्ण पुष्प पाचोळा सुखशयन पुरत जीवाला गत जन्म जोडि हा दुवा परि पाहुनि पाळण्यांत घ्याव्या गात गात मंजुळ गीता दे व्यापतकर जी माता ९९ कंथा वा शाल दुशाला प्रेमें अथरिले कुणि कुणा ठेविलें न अजुनी नांवा दो जन्मींच्या सकल खणा आंदोलन येतां जातां ती दिग्विजय करी ललना ५५ सुगृहिणीचा वेदान्त सांगुं नको वेदांत सये मी जाणत सारा प्रकृति पुरुष हीं आम्ही दोघे वावरतों गेहीं पुत्र कन्यका रूपें नांदे माया ती देहीं प्रेमाद्वैती अमुच्या न मिळे द्वैताला थारा जिवाशिव भेटी होति अहर्निश ब्रह्मानंद घडे मी निर्गुणपति सगुण-मूर्ति तत्पूजन छंद जडे पंचप्राणांची सुममाला वाहिन उपचारा ५६ कृष्णाचा हट्ट सोड सोड तान्हुलिया छंद हा न घेई. गगनिं दूर चंद्र तुझ्या हातिं केंवि येई दर्पण हैं तुजपुढती त्यांत निरखि बाळा काय दिसे सांग मला बोल बोल वेल्हाळा देउं कोणता जरि हे चंद्र दोन ठाई रडास म्हणुनि चंद्र तुला हंसतसे पहा हा कां न तूंहि हंससि तया उद्गारुनि हा हा हा फजित करुनि चंद्रा मज गोड मुका देई