पान:पद्य-गुच्छ.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिव्य मोटार समद्यांच्या तिकिट हाती सामानहि भरलं भारी फळाफुलांच्या करंडया वरी यंत्रांत शिलगली आग हज्जार कोस आगमाग मोटार हाकाया बसला त्येचा चेहरा दरेस कसला लई हुशार यो ड्रायव्हर दुसन्यान करी कारभार बिन हात लावता जरा उलटसुलट घेत्याती फेरा मोटार चालली तडक हवि तशी मऊ अन कडक बाजू ना उजवी डावी मग खणचा हात कोण दावी भरधाव चाल मोटार माग पसर कोसकोसभर बिन सांध्याचि ही मोटार गाडीच बनवलं घर एकला गडी ड्रायव्हर न्हाइ पल्डी कधि आजवर भांडवल बी त्येच घरच सार हिशेब हातोहातच विन ब्रेक अशी मोटार अक्षि अखंड चाले टूर ये मोटारीच नांव इद्वान इश्व म्हणत्याती प-७ ९७ दिलि जल्माचि मांडुन खातीं ट्रंक डब उंच डोंगरी साता समिंद्राच्या घागरी कोण पेटवि त्येचा न थांग पसरली अक्षि धगधग गडि कधी कुणा ना दिसला हरणार समदा फसला एक हातच चाकावर डोळा ठेवी समद्यावर चाक फिरत्याती गरगरा न्हाइ खिनाचा त्येना थारा जाइ तकड सडकच सडक जणु संगमरवरी खडक तिला घरायला होवावी मन मानल तकड न्यावी शेडनक्षित्राचा धूर वाजत शिंग ओंकार उतराया चढाया न दार जल्माचि त्यांत येरझार त्येला लाग ना कुणी क्लीनर करण्याला इक्ति रीपेर मोजिना कुणाला कच्च मग कुणा इचारी कसूच चिन 'लेसन' बी ड्रायव्हर न्हाइ कधीं जणूं संपणार हव तस कुणी ठवाव इचिमन शब्द बिन येती