पान:पद्य-गुच्छ.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खळखळणाऱ्या प्रवाहास जरी कां लाभला असतां प्रसंगी सूचना द्याया तुम्हासम त्यास सन्मंत्री चुकाही तो न करता या अनादरि आय कुंभार म्हणोनी जालां क्रुद्ध परी घटक तुम्हि असतां तरी खर' अन्यथासिद्ध चुकोनी अंश तेजाचा मिळाला काजव्यापुच्छी प्रकाशाया जगा सान्या तयानें मूर्ख तो इच्छी जसा कण रेडियमचा तो अनंत-स्फुरण-गुणशाली सहस्रां अन्न पुरवाया जशी पांचाळची स्थाली तसे वाटे तुम्हां अपुले अगाध ज्ञान कणमात्र म्हणोनी दोप काढाया जगाचे मानितां पात्र ९५ ५१ खळखळणाऱ्या प्रवाहास - प्रवाहा खळखळ कां करिसी अधोगती विक्रम मानुनि व्यर्थ काय मिरवीसी वर्षाकाळी गिरिवर देतां जळ पुष्कळसें तुजला स्वार्जित धन मानुनी मदानें विसरुनि जासी त्याला तटवासी कोमल वृक्षलता सकल करुनि निर्मूल वाहविसी त्या दाहि दिशांना हेंच काय तव शील शरत्कालिं गिरिशिखरी पोकळ ढग पाहुनियां हंससी मम पात्रांतुनि अजुनि वाहतें पहा जळ कसें म्हणसी उष्णकाळ येइल प्रखर मग विसरुनि जाइ जळाला खळखळ थांबलि पाहुनिया तव जन इसतिल तुजला