पान:पद्य-गुच्छ.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९४ पद्य-गुच्छ ५० निंदकाला परत भेट जगा निंदावया चाले अहर्निश जीभली तुमची उडविती आगिचा भडका लवंगी तिखट जणु मिरची तुम्हां दोपाविना दुसरें दिसेना कांहिंही चांग जो प्रभु विश्व रचितांना पुरेशी प्यायला भांग स्वताच्या काळिजी काळे विदोषी रक्त जे भरलें तयें नेत्रांतुनी तुमच्या जगाचें तोंड सारविलें तुम्ही विद्वेषबुद्धीचा प्रभावी अग्नि पेटविला तयें जगतांतल्या सान्या गुणांचा सिंधु आटविला करी शुभ्रास काळेरें ऋजू तें वक्र ही किमया कुठे गेलां शिकायाला कुविद्या थोर मोहमया सुधामय चंद्रबिंबाचे तुम्हाला डाग ते दिसती पवित्री पात्रं गंगेच्या तुम्हाला आढळे रेती डुले जरि रसिक आनंदें प्रभाती कोकिळा गातां गळा काळा तिचा कांही असा हा दोष दाखवितां प्रकाशा सर्व विसरोनी दिव्याची काजळिच बघवे तमाचा शत्रु रवि म्हणतां तरी कां रात्रिचानुगव धराधर थोर मेघांना निमंत्रुनि करविती वृष्टी तयांचे अंग खडकाळे म्हणोनी होतसां कष्टी नद्यांचे पर वाहोनी समृद्धी प्राणिमात्रांना चिखल तो लागतो पायां म्हणोनी त्यांसि अवमानां कमळिं जन्मे महालक्ष्मी बहाती पुष्प देवाला सुगंधा वाण त्या म्हणुनी म्हणां त्या रानटी पाला पितामह जेधवां बसला विधाया विश्वरचनेला नये पाचारिलें नाहीं तुम्हाला राग तो आला