पान:पद्य-गुच्छ.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चिमणीचे घरटे परी लागती माझ्या राशी दुष्ट सर्प कावळे अधाशी सोसुं जाच मी कोठवर कशी आलें स्थळ तें दुसरें बघणे म्हणुनी आलें तुमच्या दारों नको मज आतां जागा दुसरी लोढुं नका अवकृपा करुनि दुरिं खुशाल चेंडू माझा प्रियकर ( ठेवो त्याला सुखांत ईश्वर ) बागडतो या त्या झाडावर छाती रंगित काढोनी वर परि गृहकर्मी मलाच झटणें अजुनि न माझी कुस वांझोटी चार वाळके अशिच गोमटी प्रसविन तान्ही होतिल मोठी हवी सोय मजला त्यांसाठी चिव चिव करुनि माझ्या भोंवति मुले पहाही उडती पडती परं त्यांस हे नुकते फुटती कीड मुंगी मी चोंचित धरुनी वालिन त्यांना खाया लागुनि तत्प्रतिपालन हेंचि मम जिणें ८९