पान:पंढरीचा वारकरी.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७ बोलू लागलों तेव्हां तुझी तुकारामाचे भजन करून पाप घालविण्याच्या उद्योगांत होतां. मग मी प्रश्न के- ल्यावर विठोबाच्या भजनाचा कडाका चालविलात, आणि आतां ह्मणतां की चंद्रभागेच्या स्नानाने पाप जातें. चंद्रभागेच्याने तुमचा पापमळ तर घालववत नाही, पण तुझीच आपल्या आंगाचा मळ तींत टाकून तिचें स्वच्छ पाणी मलीन करितां. तिच्याने तुमचा पापरोग दूर करवत नाही, पण तिचें पाणी तुमच्या मळानें रोगी होते. आणखी असे पाहा, की चंद्रभागेच्या स्नानाने पाप जातें तर मग तुझी एथेंच कशाला आलां? ही नदी एथून पुष्कळ लांबवर गेली आहे. तर जेथून ती तुमच्या गांवास जवळ असेल, तेथे जाऊन स्नान केले तर चालणार नाही ? अहो लोकहो, तुह्मी सर्व अंधळे आहां, तुह्माला खरा मार्ग ठाऊक नाही. तुझी मला ह्मणालां की पूर्वसंचिताशिवाय पंढरीची वारी घेता येत नाही, पण मी खरोखर तुह्मास सांगतों की, ज्याच्या पदरी अज्ञानाचा व भोळेपणाचा ठेवा आहे तोच वारकरी होतो. वा०-तुझी कांहीं ह्मणा, आह्मास आमचा विठोबा खरा, त्याचें माहात्म्य मोठे ह्मणून आह्मी एथें आलों. . गृ०-विठोबाचें माहात्म्य कोणी वाढविलें ? हे सर्व ढोंग . . - -