पान:पंढरीचा वारकरी.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८ आहे; विठोबा पहिल्याने जैनांचा देव होता. नंतर ब्राह्मणांचें वळ चालू लागल्यावर त्यांनी त्याला त्यांपासून हिसकावून घेऊन आपला देव केला. आणि आतां ह्या बडव्यांनी लोकां- पासून पैसा उपटण्याकरिता त्याचे एवढे स्तोम वाढविलें. विठोबाच्या दर्शनाने लोकांचे कल्याण होतें असें बडव्यांस वाटते, तर तें दर्शन त्यांनी इतकें अवघड करून ठेविलें नसते. परंतु त्यांचा सर्व मतलब लोकांस ठकवायाचा आहे. त्यांस लोककल्याणाची अगदी काळजी नाही. पाहा दर्श- नासं जातांना हजारों लोकांची दाटी होऊन तेथें कित्ये- कांच्या हातापायांचा चुराडा होतो! कित्येक त्या गर्दीत ठार मरतात. ज्यांस दर्शन होतें ते घामाघूम होऊन आपला जीव बचावून मात्र त्या गचडींतून एकदांचे बाहेर पडतात. तरी ह्या निर्दय बडव्यांनी देवळास एकच द्वार ठेवून आपला अर्थ साधला आहे. जे श्रीमंत आहेत त्यांजपासून पुष्कळ द्रव्य मिळविण्याची त्यांनी अशी युक्ति काढली. आहे की, त्यांच्यासाठी ते पुजा बांधतात, ह्मणंजे.जसा कोणी पैका देईल

  • हे पुस्तक लिहिले तेव्हां (सन १८६५) असेंच होते. त्याच्या

मागून सरकाराने एका सुधारलेल्या हिंदु डे० कलेक्टराच्या सूचने- वरून नवीन दारे वगैरे पाडली.