पान:पंढरीचा वारकरी.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Quy वा०-सगळे जग एथें लोटले आहे. तें उगेच का? पाप जातें ह्मणूनच की नाही ? ? गृ०-सगळे जग आपलें पाप घालविण्यासाठी एथें आलें आहे हे कशावरून? ह्या यात्रेत कोणी व्यापारी आहेत, ते लोकांस फसवायास व आपली माल विकायास आले आहेत. दुसरे कोणी यात्रेची मौज पाहायास व नाना प्रकारचे पदार्थ विकत घ्यायास आले आहेत. कोणी आपल्या सख्या सोय- यांच्या व इष्टमित्रांच्या सोबतीने आले आहेत, कोणी भीक मागायास मिळाले आहेत, दुसरे सोदे लुच्चे लोक बदक- मांसाठी जमले आहेत, कोणी चोर भामटे व उचले आहेत, आणि कोणी बडव्यांच्या भूलथापीने आले आहेत; बहुतेक तर जन जातें ह्मणून आपण जावे असा विचार करून आंध- ळ्याप्रमाणे. येतात. पण खरोखर पाप घालविण्यासाठी येणारे असे ह्या यात्रेत थोडेच मिळतील. आणि मी तुह्मास दुसरें असें पुसतों की विठोबाच्या दर्शनाने पाप जातें हे कशावरून? वा०-चंद्रभागेचें स्नान घडल्यावर पाप राहील काय? गृ०-आतां तर तुह्मी भिमावळाचे भक्त झाला ? विठोबास सोडलेत काय ? काय हा तुमचा खुंटावरच्या कावळ्यासा- रखा चंचळ भाव अनेक ठिकाणी नाचतो. मी तुमच्याशी -