पान:पंढरीचा वारकरी.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

9 मातापित्यांची सेवा कां कराना ? मग तुमच्याही भेटीस विठोबा येईल. तुह्मी घरी आपल्या आईबापांचा अपमान करितां, त्यांस शिव्या गाळी देतां, त्यांस निष्ठूर शब्दांनी बोलतां, त्यांस धड अन्नवस्त्र देत नाही, त्यांच्याशी खटला करून, जिनगीची वाटणी मागतां, त्यांजवर सरकारांत फिर्या- दीस जातां आणि एथें विठोबापाशी उद्धार मागायास येतां, तर तो तुह्मास कसा उद्धरील? आणि विठोबाला उद्धरा- याची शक्ति कोठे आहे ? तुमच्याच ग्रंथांत लिहिले आहे की, कृष्ण रुक्मिणीच्या शोधार्थ फिरत फिरत या दिंडीरव- नांत आला व थकून दमून कमरेवर हात ठेवून उभा राहिला. दुसरा वा०-होय, राधेच्या नादी आपले पति लागले ह्मणून रखुमाबाई रुसून गेल्या होत्या त्यांस पाहावयास कृष्ण देव एथें आले खरे, ही गोष्ट पुराणांत आहे. गृ०-कृष्णाला देव ह्मणूं नये. जो आपली लग्नाची बायको टाकून परस्त्रीच्या नादी लागतो, त्याला मनुष्यही मयूं नये; तो पशु. आणि कृष्णासारख्या व्यभिचारी माण- साला देव कसें ह्मणतां ? व्यभिचारी माणसाच्याने तुमचा उद्धार कसा करवेल ? मुळी तोच पापी. तो तुमचें पाप कसें हरण करील? .