पान:पंढरीचा वारकरी.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ - - - गृ०-देवाचे ह्मणूं नका, विठोबाचे ह्मणा. विठोबाने तुह्माला बोलावणे पाठविले होते काय ? वा०-होय, बोलावणे अक्षयीचे आहे. विठोबा महाराज भक्तांकरितां एथे येऊन तिष्ठत उभे राहिले आहेत; आणखी दुसरें कसले बोलावणे पाहिजे ? गृ०-विठोबा भक्तांकरितां एथें आला नाही, "पुंडलिका भेटी पांडुरंग आलेगा" असें वाक्य आहे. वा०-बरें, मग पुंडलिक भक्त नव्हता काय ? गृ०-नाहीं; तो विठोबाचा भक्त नव्हता. तो आपल्या आईबापांचा भक्त होता. त्याला विठोबा माहीत होता असेंही वाटत नाही. जेव्हां त्याच्या दारापुढें विठोबा येऊन उभा राहिला तेव्हां त्याने त्याचा आदर सत्कारही केला नाही. तो त्यास भेटायासही बाहेर आला नाही. आंतूनच त्याने त्याला एक विट फेकून दिल्ही. अशी कथा तुमच्या पोथींत आहे की नाही? वा०-होय आहे. आणि पुंडलिकाने त्याला नाही सांगि- तले की, विटेवर उभा राहून जे दर्शनास येतील त्यांस उद्ध- रीत जा? ह्मणूनच आह्मी एथें आलों. गृ०-बरें तर तुझी घरी राहून पुंडलिकाप्रमाणे आपल्या .